Mahatma phule Mahamandal Loan Yojana
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडुन मिळणाऱ्या कर्ज निधीतून या महामंडळाच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी सवलतीच्या व्याजदराने व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांना ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी त्या त्या गटातील तरतूदी नुसार महामंडळाचे संकेत स्थळावर Online पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेच्या अटी, शर्ती व इतर आवश्यक कागदपत्राची सुची उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
फक्त अनुसूचित जाती व नवबोद्ध समाजातील व्यक्तीसाठी
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक PDF फॉरमॅट मध्ये फाईल बनेल.सदर फाईलची प्रिंटाऊट व खाली नमूद कागदपत्रांच्या सत्य व छायांकित प्रती ३ दिवसांच्या आत व्यक्तिशः जिल्हा कार्यालयात दाखल करावेत.
फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र
- जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट)
- व्यवसायाचा जागेचा पुरावा
- उत्पन्न दाखल (३ लाखापर्यंत)
- राशन कार्ड
- प्रशिक्षण प्रमाणपत्र (असेल तर)
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- जमीनदारचा १ फोटो
- जमीनदारांचे आधार कार्ड
- राशन कार्ड (अनिवार्य नाही)
- जमीनदारचे हमीपत्र किंवा ७/१२ उतारा
फॉर्म कसा भरायचा खाली विडिओ पहा
