एनबीसीएफडीसी व इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांच्या संयुक्त विध्यमाने इतर मागासवर्गीय बेरोजगार युवक - युवतींसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रता धारक व शारीरिक दृष्ट्या सक्षम परंतु सध्यस्थितीत (पुढील) शिक्षण घेत नसलेल्या इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
# प्रशिक्षणाचे नाव आणि प्रवेश पात्रता खालीलप्रमाणे :
१) सर्टिफिकेट कोर्स इन सी.एन.सी. टर्निंग / मिलिंग : १० वि / १२ वी / ITI (फिटर / टर्नर / मशिनिस्ट) / डिप्लोमा (मेकॅनिकल / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल)
२) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॅड / कॅम : डिप्लोमा / डिग्री पास (मेकॅनिकल / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल)
# प्रशिक्षणाचा कालावधी : ०५ महिने (७८० तास)
# प्रशिक्षणार्थी संख्या : २०
# प्रकार : अनिवासी
# विद्या वेतन : लागू आहे
# अधिक तपशील खालीलप्रमाणे :
१) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले इतर मागासवर्गीय (OBC / EBC & DNTs) समाजाच्या किमान वय १८ वर्ष पूर्ण असलेल्या इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज त्या अनुषंगाने कागदपत्रांच्या छायाप्रतीसह १२-१२-२०२० पर्यंत स्पीड अथवा साध्या पोस्टाने किंवा प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर सादर करावे
२) विहित नमुन्यातील अर्ज igtr-aur.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत.
३) वार्षिक कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा ओबीसी वर्गासाठी रु ३ लाख आणि EBCs वर्गासाठी वार्षिक कुटुंब उत्पन्नाची मर्यादा रु १ लाख किंवा अधिकृत अंत्योदय अन्न योजना कार्ड किंवा दारिद्र्य रेषेखालील कार्ड असलेले उमेदवार पात्र असतील
४) अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे
५) महिला उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येतील
६) अनिवासी प्रशिक्षणा दरम्यान दरमहा रु १ हजार विद्यावेतन बँक खात्यावर जमा करण्यात येतील
अंतिम दिनांक अर्ज स्वीकारण्याची : १२-१२-२०२०
पात्रता प्रवेश परीक्षा / मुलाखत : १६-१२-२०२० सकाळी ११.०० वाजता
ठिकाण : इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद
# प्रवेश परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी मूळ कागदपत्रे व त्याच्या फोटो कॉपीज (झेरॉक्स) दोन सेट बरोबर घेऊन येणे.

0 Comments