पोलीस भरती पूर्व परीक्षाच्या ओनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी २०२०
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर, येथे कार्यरत असून राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांच्या निशुल्क ओनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, बह्र्तक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व धनगर समाज या घटकातील नोन्क्रिमिलेअर उतन्न गटातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर Notice Board या लिंकवर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज सदर संकेतस्थळावर दि. २५-१२-२०२० पर्यंत अपलोड करावे. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षनाच्या नोंदणीवेळी उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र व इयत्ता १२ वि उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सदर करावे लागेल याची नोंद घ्यावी.
कार्यालयाचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर

0 Comments